जीवाशिवाची बैलजोड (डौल मोराच्या मानंचा)
चित्रपटः तांबडी माती
गीतः योगेश (भालजी पेंढारकर)
संगीतः आनंदघन (लता मंगेशकर)
गायक: हृदयनाथ मंगेशकर
यांच्यावर चित्रीत: दादा कोंडके
जीवाशिवाची बैलजोड
लावील पैजंला आपली कुडं..
डौल मोराच्या मानंचा रं, डौल मानंचा..
येग रामाच्या बानाचा रं, येग बानाचा..
तान्या सर्जाची हा नाम जोडी
कुना हुवीत हाती घोडी, माज्या राजा रं..
धरती आबाळाची चाकं
तेच्याव् दुनिवेची ओ गाडी
सुर्व्या चंदराची ओ जोडी
तेच्याव् सर्गाची रं माडी, सर्गाची माडी..
सती संकराची माया
इस्नू लक्शीमीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी, माज्या राजा रं..
http://www.youtube.com/watch?v=rdkBNQxu7CM
No comments:
Post a Comment